विजयी भव: भाग २ - 'हजारांत' एक...
सर डॉन ब्रॅडमन, जॉर्ज हेडली, सर विवियन रिचर्ड्स, वीरेंद्र सेहवाग, ख्रिस गेल, ए बी डी विलियर्स किँवा सध्याचा सूर्यकुमार यादव ह्यांसारखे बॅट्समन स्वतःच्या ताकदीने आणि स्फोटक फटाक्यांनी विरुद्ध संघांना नामोहरम करतात किँवा करायचे. आणि हे अगदी पटण्याजोगं आहे कारण, कुठल्याहि बॉलरला स्वतःची अशी धुलाई करून घेणं अजिबात आवडत नाही. आणि दुसऱ्या अनुषंगाने बघायला गेलं तर, हि त्या बॅट्समन्सची कसब आहे कि जेव्हा प्रतिस्पर्धी त्यांच्या संयम, एकाग्रता आणि धांवांची भूक याने हैराण होतात आणि त्यांना आऊट कसं करायचं ह्याचा प्लॅन करायला चुकतात. विजय सॅम्युएल हजारे असेच एक बॅट्समन होते. आपल्या विजयी भव सीरिजचे पुढचे अमूल्य विजय. हजारे यांचा जन्म मार्च ११, १९१५ ला कृष्णाकाठी सांगलीमध्ये झाला. १९९५ साली बडोद्याला त्यांच्या घरी त्यांनी दिलेल्या एका दुर्मिळ मुलाखतीमध्ये त्यांनी गंमतीने म्हटले होते कि, "माझं जन्म वर्ष खूप महत्वाचं आहे, निदान क्रिकेटच्या दृष्टीने. १९१५ ला च दोन महान क्रिकेटर्सना आपण गमावलं - डब्लू जी ग्रेस आणि व्हिक्टर ट्रम्पर. बहुदा त्यांनी त्यांची इंनिंग संपवली कारण त्यांनी ऐकलं कि माझा जन्म ...